चंदगड : (प्रतिनिधी)
हेरे-सरंजाममधील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करून हा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवा, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व तहसीलदार विनोद रणवरे यांना बुधवारी मंत्रालयातील बैठकीत दिल्या.भाजपचे नेते शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी हेरे-सरंजाममधील ५५ गावांतील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून हा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी रेखावार व तहसीलदार रणवरे यांनी या प्रश्नाची सद्य:स्थिती महसूलमंत्र्यांसमोर मांडली.त्यावेळी महसूलमंत्री पाटील म्हणाले, सध्या आचारसंहिता लागू असल्याने याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकत नाही. मात्र, आचारसंहिता संपल्यानंतर हा प्रश्न प्राधान्यक्रमाने हाताळून तो कायमचा निकाली काढाअसे सांगितले.यावेळी माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, राम पाटील यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा