डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत कमकुवत गोष्टींचे रूपांतर बळस्थानात करा – संगमेश देशमुख, बर्कले इंडिया
जयसिंगपूर : (प्रतिनिधी)
येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बर्कले इंडियाचे व्हा. प्रेसिडेंट व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. संगमेश देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम होते.
याप्रसंगी श्री. देशमुख म्हणाले की, आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध व कठोर परिश्रमाला पर्याय नाही. स्वतःमधील कमकुवत गोष्टींचे रूपांतर बलस्थानात केल्याने आपल्याला हवी ती गोष्ट आपण साध्य करू शकतो. डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालया सारख्या गेली 30 वर्ष उच्च कार्यक्षमता व सर्व सोयींनी युक्त महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे. डॉ. विजय मगदूम यांनी संस्थेच्या अभिमानास्पद वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली. उपाध्यक्षा ॲड.डॉ सोनाली मगदूम म्हणाल्या की, महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापकवर्ग, सोयी सुविधा व इतर कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी करिअर घडवावे. कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विकास व कल्याणासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्र.प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्लेसमेंट साठी असलेल्या आवश्यकता विषद केल्या. प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. एम. बी. भिलवडे यांनी स्वागत केले. आभार डिन स्टुडंट्स प्रा. पी. पी. पाटील यांनी मानले. संयोजन डॉ. एस. एम. अत्तार, प्रा.पी.ए. चौगुले, श्री. विनायक चव्हाण आदिनी केले. कार्यक्रमास नव्याने प्रवेशित सर्व विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक, सर्व डिन्स, विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा