शैक्षणिक

डॉ. जे. जे.मगदूम अभियांत्रिकीच्या ५३ विद्यार्थ्यांची निवड

जयसिंगपूर : (प्रतिनिधी)
येथील डॉ.जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या ५३ विद्यार्थ्यांची जेड ग्लोबल , रेवेंचर , व्हरचुसा , पारीविप्रो,जेजे रिलीस, डिझाईन टेक, मेनन ग्रुप आणि
ए. टी. टेक्नॉलॉजीस या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी विविध पदावर निवड झाली. या सर्व कंपन्या जागतिक मानांकित सॉफ्टवेअर निर्मिती कंपन्या असून जगभरात अनेक देशांमध्ये या कंपन्यांचे कार्पोरेट ऑफिसेस आहेत. सध्या इंजिनिअरिंग क्षेत्रात जोरदार स्पर्धा असल्याने डॉ.जे. जे.मगदूम संस्थेला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे. चालू वर्षांमध्ये ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. कॅम्पस इंटरव्ह्यू साठी एकूण तीन फेऱ्या घेतल्या जातात अप्टीट्युड, टेक्निकल आणि पर्सनल राऊंड इ. सर्व फेऱ्यांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली.
जेड ग्लोबल ०९ , रेवेंचर ०६ , व्हरचुसा १० , पारीविप्रो ०३,जेजे रिलीस ०५, डिझाईन टेक सिस्टिम्स ०८, मेनन ग्रुप ०८ आणि ए. टी. टेक्नॉलॉजीस ०४ या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अशा एकूण ५३ विद्यार्थ्यांची निवड झाली. यासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्राध्यापक पी. पी.माळगे यांनी परिश्रम घेतले. संस्थाध्यक्ष डॉ. विजय मगदूम व उपाध्यक्षा ॲड. डॉ. सौ. सोनाली मगदूम यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. एस. आडमुठे, प्र. प्राचार्या डॉ. सौ. एस बी.पाटील व सर्व विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected