गुन्हे

सांबर सदृश्य प्राण्याची शिकार चंदगड पोलिसांनी दोघांना पकडले

आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता

चंदगड (प्रतिनिधी) :
चंदगड तालुक्यातील तुडये-कोलिक रोडवरील जंगल भागात शिकार करणाऱ्या दोघांना पकडण्यात चंदगड पोलिसांना यश आले आहे. वन विभागाच्या मदतीने त्यांच्याकडून शस्त्रसाठा आणि सांबर सदृश्य प्राण्याचे मास हस्तगत करण्यात आले आहे.शहा सैफुद्दीन शमशुद्दीन (रां. बेंगलोर, कर्नाटक) व चेतन कुमार सुभाष चंद्र अभिगिरी (रा. गदग, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.यावेळी वनविभागाचे प्रशांत आवळे (वनक्षेत्रपाल पाटणे) यांच्या मदतीने चंदगडचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या नेतृत्वात ही संयुक्त कारवाई करण्यात आली. चार वाहनातून आलेल्या १० ते १२ जणांच्या टोळीने ही शिकार होत होती. दरम्यान अन्य साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. ही आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुडये-कोलिक रोडवरील जंगल भागात आज (शुक्रवार दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी) पहाटे 3 च्यासुमारास तुडये-कोलिक रोडवर पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे रात्रगस्त करत असताना एका पोल्ट्रीजवळ 10-12 जण चार वाहनासोबत संशयितरित्या दिसून आले. त्यांना हटकले असता त्यातील सर्वजण पळून जाऊ लागले आता त्यातील दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यातील एकाच्या ताब्यात स्नॅपर रायफल व एका वाहनांमध्ये वन्य प्राण्याचे मास आढळून आले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी प्रशांत आवळे (वनक्षेत्रपाल पाटणे) यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावून वाहनाची तपासणी केली. त्यामध्ये सांबर सदृश्य प्राण्याचे मास मिळून आल्याने त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी यांचा आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता असून त्याबाबत तपास चालू आहे.सदरची कारवाई पोलीस व वन विभागामार्फत संयुक्तरीत्या करण्यात आली. यावेळी पोलीस दलातील पो. शि. संदीप कांबळे, पोलीस नाईक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी या आरोपींना सिताफिने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस विभागाकडून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस शिपाई संदीप कांबळे, पोलीस नाईक डोंगरे, पोलीस शिपाई युवराज पाटील, पोलीस नाईक भदरगे यांनी सहभाग घेतला. तर वन विभागाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, एन.एन धामणकर (वनपाल तुडिये), बी.आर भांडकोळी (वनपाल कळसगादे), तांबेकर (वनरक्षक कोलिक), एम.आय सनदी (वनरक्षक कोलिक), विश्वनाथ नार्वेकर (चालक) यांनी केली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज नितेश खाटमोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस व वन विभागाने संयुक्तरीत्या केली आहे. पुढील कारवाई एन.एस कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत आवळे (वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे) हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected