घोडावत समुहाच्या उत्पादनाची जागतिक स्तरावर निवड
जयसिंगपूर / प्रतिनिधी
संजय घोडावत समुहाच्या, घोडावत कन्झ्युमर चे उत्पादन असलेल्या ‘सुपर सेव्हन स्प्राऊट’ ची टू बी ऑनेस्ट फुड्स विभागात जागतिक स्तरावर निवड झाली आहे. गलफूड इनोवेशन अवॉर्ड 2023 साठी जगभरातून 1000 उत्पादना मधून 15 उत्पादनांची निवड करण्यात आली, त्यात याचा समावेश आहे.
भारतातून एकमेव उत्पादनाची निवड या पारितोषकासाठी झाली. बेस्ट हेल्थ अँड वेलनेस प्रॉडक्ट यादीमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा गलफूड दुबई यांच्याकडून घेण्यात येते.जीसीएल चे प्रमुख श्रेणिक घोडावत यांनी या विषयी माहिती दिली.यावेळी ते म्हणाले,की हा खूप अभिमानाचा क्षण आहे.जीसीएल च्या उत्पादनाने जागतिक स्तरावर मिळवलेले हे यश येथे काम करणाऱ्या सर्व कामगारांचे, अधिकाऱ्यांचे आहे.याबद्दल संजय घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा
One Comment