तेगिनहाळचा अवलिया कलाकार स्व. भैरू सुतार
नेसरी /प्रतिनिधी
तेगिनहाळ ता.गडहिंग्लज येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक तसेच एक अवलिया कलाकार भैरू लक्ष्मण सुतार वय 88 वर्ष यांचे शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी सकाळी 7 वाजून 31 मिनिटांनी निधन झाले त्यांचा थोडक्यात अल्पपरिचय.स्व. भैरू सुतार यांचे शिक्षण जुनी 2 री पर्यंत मोडिलिपितून झाले होते मात्र ते मराठीतून लिहायचे व वाचायचेही त्यांचा स्वभाव हट्टी, व आदरयुक्त असा होता एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती लहानपनापासून ते शाडूमातीपासून गणेशमूर्त्या बनवत असत तर पी ओ पी च्या जमान्यात ते पी.ओ.पी पासून ही मुर्त्या बनवू लागले होते कोणताही अनुभव नसताना ते पी.ओ.पी पासून पॅटर्न पण बनवत असत तर श्री महालक्ष्मीच्या पण त्यांनी शिवणीच्या लाकडात मुर्त्या बनवल्या होत्या तसेच ते दगडी मूर्त्याही बनवत असत मूर्त्यांवर ते उत्कृष्ठ रंगकामही करीत असत त्यांना भजन व कीर्तन ऐकण्याची आवड होती ते भजन म्हणत असत पखवाज,तबला,व सुरपेटी वादन ते करीत असत स्वतः त्यांनी घरामध्ये जर्मन स्वरात एक लहान व एक मोठी सूरपेटी तयार केली होती तसेच ते सुरपेटी दुरुस्त ही करीत असत ते श्री लक्ष्मी चरित्र, श्री पंत चरित्र,श्रीमद भगवदगीता,श्री गणेश चरित्र आदी धार्मिक ग्रंथांचे ते नेहमी वाचन करीत असत सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा सर्वजण त्यांना आण्णा म्हणून बोलवत असत त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण गाव एका अवलिया कलाकाराला मुकला आहे असे म्हणावे लागेल त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती तूळसाबाई,मुले दत्तात्रय,सुभाष,विठ्ठल सुना- भारती,संगीता, विद्या नातवंडे संदीप,किशोर,वर्षाराणी,जयेश,ज्योती,वैष्णवी,वासंती,सिद्धेश मुलगी सुलोचना तानाजी सुतार (मनगुत्ती)असा परिवार आहे
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा