बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यीनीची आत्महत्या
चंदगड / प्रतिनिधी
गुरुवारी 25 मे रोजी लागलेल्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थिनीला कमी गुण मिळाल्याने नैराश्याने घरीच दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना 27 मे घडली.मनाली मधुकर सावंत (वय 18) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती कोल्हापूर जिल्ह्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील रहिवाशी होती.परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्यात येऊन तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली.
चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील रहिवाशी असलेली मनाली हिने बारावीची परीक्षा दिली होती. गुरुवार दि.25 रोजी निकाल लागला या निकालात कमी टक्केवारी मिळाल्याने निराश होऊन शनिवार दि.27 मे रोजी घराच्या दुसऱ्या मजल्याच्या तुळीला दोरीने गळफास लावून घेतला असता मनाली हिची आई संगीता हिने पायाकडून उचलून आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलावून गळफास सोडवून घेऊन खाली उतरवले.बेशुद्धावस्थेत बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली.शिवाजीराव सखोबा सावंत वय 65 यांनी चंदगड पोलिसांत याबाबतची रीतसर फिर्याद दाखल केली.मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा व प्राथमिक तपासाकामी पोहेकॉ.सरंबळे यांना रवाना केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या आदेशानुसार पोहेकॉ.महापूरे करत आहेत
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा