मराठी विद्या मंदिर येथे शाहू महाराज जयंती साजरी
चंदगड / प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवणारा हा लोकराजा-लोकनायक दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवल्या,कलेला प्राधान्य देत लोककला वाढवल्या,सामाजिक परिवर्तन घडवले,समतेचा पाया बसवला असे प्रतिपादन मुख्याध्यापक जे.एम.अस्वले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.ते छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यामंदिर किटवाड येथे बोलत होते.
शाळेतील एकूण 16 विद्यार्थ्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे विचार विद्यार्थ्यांसमोर सादर करत भाषणामध्ये भाग घेतला. या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुलांचे कलागुण वाढावेत यासाठी सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुक करण्यात आले.त्याचबरोबर महाराजांचे विचार विद्यार्थ्यांना देत त्यांचे विचार अंगीकृत करून त्यांच्या विचारातून आपल्या जीवनाला चालना द्यावी अशी मनोगतेशिक्षकांनी व्यक्त केली.या वेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक अस्वले यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर प्रास्ताविक के.जे.पाटील यांनी केले तर आभार सागर पाटील यांनी मानले.यावेळी एस.व्ही. तारिहाळकर,डी.एल.वांद्रे सर उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रगीताने या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा