चंदगड / प्रतिनिधी
चंदगड बाजार पेठेत मावशीसोबत हार,फुले व घड्याळाला पट्टा दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दुकान मालकाने विनयभंग केला.ही घटना रविवार दि.2 जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.याबाबतची रीतसर फिर्याद चंदगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
रविवार असल्याने अल्पवयीन निर्भया आपल्या मावशी सोबत हार फुले व घडाळ्याचा पट्टा दुरुस्ती करण्यासाठी बाजापेठेतील एका दुकानात गेली असता तिच्या अज्ञान पणाचा गैरफायदा घेऊन घडाळ्याच्या दुकानाच्या गोडावूनमध्ये घड्याळाचा पट्टा दाखवण्याचा बहाणा करून घेऊन गेला.निर्भयाचा हात घट्ट पकडून तिला जवळ घेत गळ्याभोवती हात टाकून मीठ्ठी मारण्याचा प्रयत्न करून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
निर्भयाने आरडाओरड केल्यानंतर मोठा जमाव जमला आणि ‘त्या’ दुकानदाराची यथेच्छ धुलाई केली. या मारहाणीत त्याचा एक पाय आणि हात फॅक्चर झाला.दरम्यान (दि.३) रोजी चंदगड शहर तसेच तालुक्यातील ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.या प्रकरणी त्याने माफी मागून गुन्हा कबूल केला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
हिंदू सेनेच्यावतीने चंदगड शहर बंद
या घटनेचे पडसाद तालुक्यातील सर्वच गावांत उमटले.अशा राक्षसी प्रवृत्तीला ठेचण्याची गरज आहे.अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ‘हम सब एक है, अशा निषेधाच्या घोषणा देत शहर कडकडीत बंद ठेऊन घटनेचा निषेध केला.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा