गुन्हे

मौजे कार्वेच्या विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

चंदगड / प्रतिनिधी
मौजे कार्वे ता.चंदगड येथील भागीरथी वैजनाथ नाईक वय 22 वर्षे या विवाहितेने घरातील तणनाशक पिऊन आत्महत्या केली.सोमवारी ( दि.10) रोजी तणनाशक पिल्यानंतर त्रास जाणवू लागला.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घरातील मंडळींनी बेळगावच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र उपचारादरम्यान मंगळवारी( दि.10) रोजी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.तिचे माहेर संती बस्तवाड ( बेळगाव) असून आत्महत्या बद्दल चंदगड पोलिसांत तक्रार दिली आहे.तिच्या मागे पती,6 महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected