तालुक्यातील रामपूरच्या युवकाचा चांद्रयान 3 मध्ये खारीचा वाटा ; प्रोपल्समध्ये पुरवले क्रँक शाफ्ट
चंदगड / प्रतिनिधी
भारताच्या पृथ्वीवरून झेपावलेल्या चांद्रयान ३च्या विक्रम लँडरनं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आणि भारतानं नवा इतिहास रचला.हा इतिहास घडवण्यासाठी इस्रोनं प्रचंड मेहनत घेतली आहे. तसेच भारतातील विविध कंपन्यांनीही या मोहिमेत मोलाचं योगदान दिलं आहे.यामध्ये आंध्रप्रदेश मधील एका कंपनीने हायड्रोजन गॅसचा पुरवठा केला.तसेच प्रेशर कॉम्प्रेसन मशीन मध्ये लागणाऱ्या क्रँक शाफ्ट हा महत्त्वाचा भाग साता-यातीला कपूर कॉम्प्रेशनने पुरवला आहे.
चंदगड तालुक्यातील रामपूर गावच्या युवकाने प्रोपल्शनमध्ये लागणारे क्रँक स्पॉट हा महत्त्वाचा भाग पुरवत आपले योगदान दिले आहे.त्याने देशातील या मोहिमेत खारीचा वाटा उचलला ही संपूर्ण चंदगड तालुक्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
चंदगड तालुक्यातील रामपूर येथील चंद्रकांत धाकलू ढेरे हा युवक सातारा येथील कपूर इंडस्ट्रीमध्ये नोकरी करतो त्याच्याकडून चांद्रयान 3 मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने बनवलेल्या कॉम्पलेक्स या प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली.प्रोपल्शन कॉम्प्लेक्स ने एक द्रव प्रणोदन प्रणालीत अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. ज्यामध्ये शुद्ध हायड्रोजन गॅसची आवश्यकता असते या हायड्रोजन गॅसचा पुरवठा आंध्र प्रदेश मधील एका कंपनीने केला.पुरवठा केलेल्या हायड्रोजन गॅसच्या उत्पादनासाठी तीन कटिंग एज स्टॅंण्डर्ड हार्य कॉप्रेशर मशीन हे पुण्यातील बर्कहार्ट कॉम्प्रेशन या कंपनीने दिले.चंद्रकांत ढेरे यांनी हा क्रँक शाफ्ट बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. देशाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेत त्यांनी दिलेले योगदान निश्चितच चंदगड वाशीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा