बस अपघातात एक ठार ; चार विद्यार्थी गंभीर जखमी
चंदगड /प्रतिनिधी
दुचाकीला बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. तर समोर शाळेला जाण्यासाठी थांबलेल्या चार विद्यार्थ्यांनाही बसने उडविल्यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे आठ वाजता चंदगड – गडहिंग्लज मार्गावर सावर्डे फाट्यानजीक चाळोबा मंदिरासमोर घडली.
बाळू तुकाराम साबळे (वय ५२ रा. सत्तेवाडी ता.चंदगड) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळू हे नेहमीप्रमाणे आपल्या (एमएच ०९ एपी ५४९८) या क्रमांकाच्या दुचाकीवरून दौलत कारखान्याकडे येत होते.सावर्डे फाट्यानजीक आले असता चंदगड- गडहिंग्लज मार्गावरून कोल्हापूरला जाणाऱ्या दोडामार्ग एसटीने धडक दिली.यामुळे ते एसटीच्या खाली आल्याने गंभीर जखमी झाले.त्याचवेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने शाळेला जाण्यासाठी थांबलेल्या चार विद्यार्थ्यांना उडविले.शुभम संजय गावडे, सिद्धेश मारुती ढोकरे (दोघेही रा. सावर्डे) तर कुणाल कृष्णा कांबळे (रा. कानडी), वैभव भरत कोंडूस्कर (रा. पोवाचीवाडी) हे गंभीर जखमी असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा