कारची झाडाला धडक, धामोड येथिल तरुण ठार
राधानगरी – अरविंद पाटील
कर्नाटकात ट्रॅक्टर आणायला गेलेल्या तरुणांचा परत येताना मुनवळी नरगुंद मार्गावर कार झाडावर आदळुन भिषण अपघात झाला. यात धामोड येथिल अजित चंद्रकांत धनवडे वय ३९ याचा जागीच मृत्यु झाला.तर उमेश शिवाजी मराठे (वय ३४), कारचालक संतोष सुरज सोनवणे (वय ४०) रा.दोघेही धामोड व दत्तात्रय लक्ष्मण बरगे (वय ४०) रा. पुंगाव हे तिघे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर सौंदत्ती येथिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तर कानकेकरवाडी येथिल शुभम कानकेकर हा ट्रॅक्टर चालवत होता म्हणुन तो बचावला आहे. ही घटना आज पहाटे सहाच्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की,कारचालक संतोष सोनवणे हे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कोपळ येथे आपल्या कारमधून गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत ट्रॅक्टर चालक शुभम सुरेश कानकेकर (रा. केळोशी, खुर्द पैकी कानकेकरवाडी) यांच्यासह मित्र उमेश, दत्तात्रय व अजित या चौघांना घेऊन गेले होते.ते ट्रॅक्टर खरेदी करून आपल्या मूळगावी परतत असताना सौंदत्तीपासून ३० कि.मी.अंतरावर असलेल्या नरगुंद मार्गावर आतमटी गावाजवळ कारचालक संतोष सोनवणे यांचा कारवरील ताबा सुटल्याने कारची झाडाला धडक बसली. यावेळी कार शेतवडीत जाऊन पलटी झाली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला.यात अजित याच्या छातीवर जोराचा मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.तर बाकीच्या जखमींच्या तोंडावर,कमरेवर गंभीर इजा झाल्या आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रामदुर्ग सर्कलचे डीएसपी रामनगौडा हटी, सीपीआय जे करणेशगौडा, उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन कारच्या मागे असलेल्या ट्रॅक्टर चालक शुभम सुरेश कानकेकर यांच्याकरवी अपघातातील जखमी व मृत व्यक्तीची ओळख पटवून कुटुंबियांना संपर्क साधला.त्यानुसार धामोड येथील अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.अपघातातील मृत अजित हे धामोड परिसरातील प्रसिद्ध ट्रॅक्टर मेकॅनिकल होते.तर जखमी उमेश यांचा स्क्रॅप विक्रीचा व्यवसाय असुन,संतोष हे लाकूड व्यापारी तर दत्तात्रय हे शेतकरी आहेत.मृत अजित यांच्या पक्षात आई, वडील,पत्नी,दोन मुले, असा परिवार आहे.या अपघाताचा पुढील तपास सीपीआय जे.करूणेशगौडा करत आहेत.सदर घटनेमुळे धामोडवर शोककळा पसरली आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा