दत्त शिरोळच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास देशपातळीवरील उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प पुरस्कार प्रदान
शिरोळ / प्रतिनिधी
साखर कारखानदारीतील सहवीज निर्मिती प्रकल्पाकरिता देशपातळीवर असलेल्या को जनरेशन असोशियन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने श्री दत्त शिरोळच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास देश पातळीवरील उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प पुरस्कार मा.शरदचंद्रजी पवार माजी केंद्रीय कृषिमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.दरवर्षी या शिखर संस्थेकडून देशभरातील सहवीज निर्मिती प्रकल्पांचे तांत्रिक परीक्षण करून पुरस्कार दिले जातात.यावर्षी श्री दत्त कारखान्याकडील सहवीज निर्मिती प्रकल्पास सहकार क्षेत्रांतर्गत कार्यरत असलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून देश पातळीवरील उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प म्हणून गौरविण्यात आले.
तसेच या कार्यक्रमात सहवीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कार्यान्वित असलेल्या तांत्रिक मनुष्यबळाचे पुरस्कार तीन व्यवस्थापकांना मल्लिकार्जुन राजमाने (बेस्ट डीएम प्लांट मॅनेजर) योगेश हुलगिरे (बेस्ट इलेक्ट्रिकल मॅनेजर) शेख शहावली बेपारी (बेस्ट इन्स्ट्रुमेंटेशन मॅनेजर) यांना उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून गौरविले गेले.
कारखाना नेहमीच आपली तांत्रिक कार्यक्षमता उत्तमपणे वापरण्याचा प्रयत्न करत असतो याची दखल घेऊनच आजपर्यंत कारखान्यास देश व राज्यपातळीवरील 67 पुरस्कार मिळाले आहेत.कारखान्याकडील ही परंपरा सहवीज निर्मिती प्रकल्पाने ही जोपासले असल्याने सहवीज निर्मिती प्रकल्पास देश पातळीवरील सहकार क्षेत्रांतर्गत उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प म्हणून गौरविण्यात आले आहे ही बाब कारखान्याच्या सभासद बंधूंना गौरवस्पद व अभिमानास्पद आहे असे कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.
याप्रसंगी साखर संघाचे चेअरमन पी.आर.पाटील, जयप्रकाश दांडेगावकर,नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर नरेंद्र मोहन,ओएनजीसीचे माजी चेअरमन सुभाष कुमार,भारत सरकारचे जॉईन सेक्रेटरी दिनेश जगदाळे तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई,श्रीमती विनया घोरपडे,सौ यशोदा कोळी,सौ संगीता पाटील,रणजीत कदम,रघुनाथ पाटील,दरगू गावडे,महेंद्र बागे संचालक मंडळ सदस्य,कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील,सचिव अशोक शिंदे,मॅनेजर फायनान्स संजय भोसले,सहवीज निर्मिती प्रकल्प व्यवस्थापक विजयकुमार इंगळे व कारखान्याचे खाते प्रमुख उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा