मंगळवारी चंदगड पत्रकार संघाच्यावतीने सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे तालुक्यातील प्रिंट (दैनिक, साप्ताहिक) व डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी होणार आहे. श्री.चारुदत्त शिपकुले (दिवाणी न्यायाधीश चंदगड) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिरास राजेश चव्हाण (तहसीलदार चंदगड), नितीन सावंत (पोलीस निरीक्षक चंदगड), बी.डी.सोमजाळ (तालुका आरोग्य अधिकारी चंदगड), सुभाष सावंत (गटविकास अधिकारी चंदगड), विजयसिंह शिंदे (आगार व्यवस्थापक चंदगड), इफ्तेकार मुल्ला (उपअभियंता सार्वजनिक बांधकाम चंदगड) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सचिन गायकवाड व संपूर्ण स्टाफ यांचे सहकार्य लाभत आहे.तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंनी सहकुटुंब वेळेत उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून उपचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा