आरोग्य

चंदगडात पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

चंदगड/प्रतिनिधी
चंदगड पत्रकार संघ व ग्रामीण रुग्णालय चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापनदिनानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकार व कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ.जे.बी.मकानदार, उद्योजक लक्ष्मण पाटील, समाज सेवक सुनील कानेकर,उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व माध्यम क्षेत्रातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला.यावेळी नंदकुमार ढेरे,उदय देशपांडे, संपत पाटील, अशोक मोहिते, संजय पाटील, शहानूर मुल्ला, तातोबा पाटील, संतोष सुतार, संजय कुट्रे संतोष सावंत-भोसले, उत्तम पाटील, सागर चौगले, संजय मष्णू पाटील आदी प्रतिनिधी उपस्थित होते.तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, डोळे तपासणी व विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार यावेळी करण्यात आले.यावेळी 35 पत्रकार व कुटुंबातील सदस्यांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.डॉ.जे.बी.मकानदार यांनी सर्व उपस्थितीतांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. सुत्रसंचलन सेक्रेटरी चेतन शेरेगार व आभार संस्थापक अध्यक्ष अनिल धुपदाळे यांनी मानले.

ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected