ग्राहक पंचायत आजरा तालुका अध्यक्ष पदी महादेव सुतार,सचिवपदी संजय घाटगे
आजरा / राजाराम कांबळे
मडिलगे येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र आजरा तालुका कार्यकारिणी निवड करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बी.जे.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील यांचे स्वागत शिवाजी इंगळे यांनी वनस्पतीचे रोप देऊन केले.यावेळी आजरा तालुका अध्यक्षपदी महादेव दत्तू सुतार, उपाध्यक्ष प्रकाश मुरुस्कर,संघटक पदी शिवाजी इंगळे, सचिवपदी संजय घाटगे,कार्याध्यक्ष काशिनाथ मोरे,महिला संघटक सुमन कांबळे, सहसंघटक नीलम पाटील,सहसचिव व्हि.डी.जाधव,सदस्य हनुमंत गुरव, भिकाजी कांबळे तसेच आजरा,गडहिंग्लज,चंदगड, भुदरगड विभाग प्रमुख म्हणून शिवाजी गुरव व कायदा सल्लागार पदी अँड देवदास आजगेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
ग्राहक पंचायतीच्या आजपर्यंतच्या कामाची माहिती पाटील यांनी दिली व तालुक्यातील कामाबाबत आढावा घेतला.यावेळी पाटील म्हणाले ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी संस्थापक बिंदू माधव जोशी यांनी कायदा करून घेतला ग्राहकांची फसवणूक वीज महामंडळ, एस.टी. महामंडळ,दुकानदार, बेकरीवाले, बँका इत्यादी बऱ्याच ठिकाणी होत असते.यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर कार्य चालू आहे.समजूतीने प्रश्न सुटले नाहीत तर थेट ग्राहक न्यायालयात दाद मागता येते यासाठी समिती ग्राहकांना मदत करते.आभार संजय घाटगे यांनी मानले.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा