राजस्थानी प्रिमियर लिग २०२४ क्रिकेट स्पर्धेचे उद्या उदघाटन
जयसिंगपूर/ प्रतिनिधी
येथील मारवाडी युवा मंच जयसिंगपूर शाखेच्या वतीने “राजस्थानी प्रिमियर लिग २०२४” हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि.२३ /१२/२०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता आयोध्या मालू क्रिडानगरी येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धा दि.२३,२४,२५ जानेवारी २०२४ या दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहेत.अशी माहिती जयसिंगपूर मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चेतन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत.तसेच मुख्याधिकारी टिनाजी गवळी यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन संपन्न होणार आहे.यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर,पोलीस उपअधीक्षक डॉ.रोहिणी सोळंकी, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, आनंदजी बेदमुथा (अध्यक्ष श्री.वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, जयसिंगपूर),श्री.दिपकजी बियाणी (अध्यक्ष, श्री.माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट,जयसिंगपूर),ग्यानचंदजी बरडीया ( जैन श्वेतांबर तेरापंथी सभा ट्रस्ट,जयसिंगपूर ),अमितजी बागरेचा (अध्यक्ष,जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ,(जयसिंगपूर), कैलाशकुमार बोरा (अध्यक्ष,गायत्री विप्न सेवा मंडळ,जयसिंगपूर) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राजस्थानी प्रिमियर लिगचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. ह्या स्पर्धेत एकूण १० संघ व ११० खेळाडू सहभागी होणार आहेत. सर्व ११० खेळाडू हे जयसिंगपूर शहरातीलच आहेत.या स्पर्धा जयसिंगपूर शहर मर्यादित असून, सर्व संघाचे प्रायोजक देखील जयसिंगपूरातील व्यापारी व उद्योजक आहेत. शहरातील मारवाडी समाजातील स्थानिक खेळाडूंना वाव मिळावा, एक भक्कम व्यासपिठ उपलब्ध व्हावे यासाठी सदरच्या स्पर्धा होत आहेत. मागील वर्षी झालेल्या अशा स्पर्धांना क्रिडा प्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.यावर्षीही या स्पर्धेचे नेटके नियोजन करण्यात आलेले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक संजय घोडावत, सुमेरमल संदीप बाफना व मेघराजजी प्रविण बलदवा आहेत.तसेच स्पर्धेचे सह प्रायोजक विनोद घोडावत, सतिश घोडावत, डॉ. प्रविण जैन, कन्हैयालाल बलदवा व नारायणदास बलदवा आहेत.या स्पर्धेसाठी बाबूलालजी मालू यांनी अयोध्या मालू क्रीडानगरी येथे सामने आयोजित करण्यास विशेष सहकार्य केले अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष प्रसन्न लुणिया,सचिव प्रविण पोरवाल,उपसचिव प्रवीण भट्टड, कोषाध्यक्ष अशोक पनपालिया,माजी नगराध्यक्ष युवराज शहा,मार्केट कमिटीचे पिंटू उर्फ प्रविण बलदवा व बिपीन बियाणी आदी उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा