मायलेकरांची तणनाशक घेऊन आत्महत्या ; अडकूर येथील घटना
चंदगड / प्रतिनिधी
एक हजार द्या पेन्शन सुरु, तीस हजार भरा घरासाठी विना परतावा ७ लाख मंजूर करुन देतो असे सांगत २० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे कळताच लोकांनी आपली रक्कम परत करण्याचा तगादा लावल्याने भितीपोटी विषप्राशन केलेल्या अडकूर येथील मायलेकरांचा मंगळवारी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली.नंदा सुर्यकांत रोटे-पाटील (वय ५०) व मुलगा शुभम रोटे-पाटील (वय ३०, दोघेही सध्या रा. अडकूर, मूळगाव यळगूड ता. हातकणंगले )
याबाबतची हकिकत अशी की,नंदा रोटे-पाटील व शुभम रोटे-पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी अडकूर येथे महा-ई सेवा केंद्र सुरू केले होते.त्यामाध्यमातून त्यांनी अनेक लोकांसह महिलांना विविध सरकारी व निमसरकारी योजनांचा लाभ मिळवून देतो अशी बतावणी करून वेगवेगळ्या लोकांकडून २० लाखांहून अधिक रक्कम उचलल्याचे समजते.पण त्या लोकांना त्याचा लाभ मिळाला नाही.काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या पैसे परत द्यावेत यासाठी या मायलेकरांकडे तगादा लावला. पण या मायलेकरांनी आपल्या चैनीसाठी त्याचा वापर केला होता.वापरलेले पैसे देण्यास असमर्थ असल्याचे ओळखताच दोघांनीही यातून सुटका मिळवण्यासाठी टोकाचा निर्णय घेऊन तणनाशक प्राशन केले.याची माहिती मिळताच गडहिंग्लज येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी दुपारी नंदाचा तर रात्री शुभमचा मृत्यू झाला. शुभमचे प्रताप सासरच्यांना समजताच त्यांनी ही आपल्या मुलीच्या अंगलट ही प्रकरणे येऊ नयेत म्हणून काही दिवसांपूर्वीच मुलीला त्यांनी आपल्या घरीही घेऊन गेल्याचे समजते.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा