राष्ट्रीय

अबब ; ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणला विक्रमी ४०.३०० किलो ऊस

हलकर्णी / तातोबा गावडा
येथील अथर्व दौलत साखर कारखान्यात एकाचवेळी ४०.३०० मे.टनाची वाहतूक करून एकाच खेपेतील ऊस वाहतुकीचा विक्रम स्थापन केला.मानसिंग खोराटे चेअरमन असलेल्या अथर्व दौलत साखर कारखान्यामध्ये संभाजी मारुती नेवगे आपल्या ट्रॅक्टरमधून नियमित ऊस वाहतूक करत आहेत.आण्णाप्पा रामू कोल्हाळ,द्रौपदी रवळू गावडे व तुकाराम गंगोजी गावडे रा.खालसा गुडवळे यांच्या शेतात तोडलेल्या उसाची ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मुकादम मोहन सोमा गावडे मजूर संख्या १३ असलेल्या स्थानिक टोळीने व्यवस्थित भरणी केली.शनिवार दि.२० रोजी कनवी मार्गे १५ किलोमीटर वाहतुक करुन कारखान्याकडे जाण्यास प्रारंभ केला.तसेच काही ठिकाणी चढउतार तर रस्त्यावर इतर वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर चालू असते. रस्त्यांनी शेकडो नागरिक आपली वाहने थांबवून व बाजूला उभे करुन भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्याकडे पाहातच होती.नंतर कारखान्यात दोन्ही ट्रॉल्यांचे स्वतंत्रपणे वजन करण्यात आले.एकूण हे ४० टन ३०० किलो वजन भरले व उपस्थित सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला.ही बातमी चेअरमन मानसिंग खोराटे यांना समजताच त्यांनी मालक व ड्रायव्हर संभाजी मारुती नेवगे यांचे अभिनंदन केले व मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते करणेत आला.यावेळी दौलतचे संचालक शिवाजी हसबे, बाबुराव शिंदे तसेच हेरे गट ऑफीसचे कर्मचारी जयवंत गावडे,प्रदिप पवार, सुभाष तुपारे,अंकुश गावडे,मालु गावडे,दत्तात्रय मोहिते व शेती हेड ऑफीसचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected