घोडावत विद्यापीठाचा बीव्हीजी इंडिया सोबत सामंजस्य करार
अतिग्रे / प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम दर्जाचे इंटर्नशिप मिळावे यासाठी पुण्याच्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत सामांजस करार केला आहे.याची माहिती कुलगुरू प्रो.उद्धव भोसले यांनी दिली.
पुणे येथे ‘टीपीओ मीट 2024’ या कार्यक्रमात झालेल्या करारावेळी बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे संस्थापक,चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर हनुमंत गायकवाड,महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे सेक्रेटरी सुदर्शन सुतार,अध्यक्ष डॉ.शीतलकुमार रवंदळे, बीव्हीजी ग्लोबल अध्यक्ष रूपल सिन्हा, घोडावत विद्यापीठाचे प्लेसमेंट प्रमुख प्रा.डॉ.स्वप्निल हिरीकुडे उपस्थित होते.
या सामंजस्य करारामुळे कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या एकूण जडणघडणीत तसेच नवनवीन रोजगाराच्या संधी बाबत व उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनी घोडावत विद्यापीठासोबत ‘प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनर’ म्हणून कार्यरत असणार आहे. या सामंजस्य करारासाठी अध्यक्ष संजय घोडावत,विश्वस्त विनायक भोसले,रजिस्ट्रार डॉ.विवेक कायंदे यांनी मार्गदर्शन केले.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा