गुन्हे
तावरेवाडीत गॅसच्या स्फोटात मायलेकी जखमी : घराचे नुकसान
चंदगड / प्रतिनिधी
तावरेवाडीत ( ता. चंदगड) घरगुती गॅसच्या स्फोटात घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.यामध्ये मायलेकी जखमी झाल्या दैव बलवत्तर म्हणून जिवीतहानी टळली.
तावरेवाडी येथील विकास बाजीराव रेडेकर यांच्या राहत्या घरातील घरगुती गॅस सिलेंडर टाकीचा रात्री तीन वाजता अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती,की शेडचे पत्रे उडून गेले. तसेच घराचे दरवाजे मोडले आणि काचेची तावदाने फुटली. यामध्ये प्रापंचिक साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे.गाढ झोपी गेलेल्या मनीषा बाजीराव रेडेकर व तिची आई गॅसच्या झळा लागून जखमी झाल्या.या घटनेची नोंद झाली नाही.तालुक्यात एका महिन्यातील ही दुसरी घटना झाल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा