खेळ

सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीचा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

अतिग्रे / संतोष कांबळे
रुकडी- माणगाव ता.हातकणंगले येथील सह्याद्री तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी आणि सह्याद्री स्केटिंग अकॅडमीची यशस्वी अकरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रुकडी येथील पंचगंगा चौक नागोबा मंदिर हॉल येथे केक कापून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या राज्य व राष्ट्रीय खेळामध्ये ज्या खेळाडूंनी मेडल प्राप्त करून यश मिळवले त्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
आजच्या पिढीला तायक्वांदो किक बॉक्सिंग व स्केटिंग शिकणे महत्त्वाचे आहे. खरे तर मुलींच्या बाबतीत बघायला गेले तर तायक्वांदो किक बॉक्सिंग हा खेळ स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्यांनी तो शिकला पाहिजे असे पालकांनी मनोगतात सांगितले. तसेच याच सह्याद्री तायक्वांदो अकॅडमी मध्ये तयार तयार झालेली अतिग्रे गावची कन्या सायली प्रकाश सूर्यवंशी हिने दिल्ली येथे झालेल्या सीबीसी नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत सिल्वर मेडल व लातूर येथे झालेल्या शालेय शासकीय राज्यस्तरीय स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात व ५५ किलो खालील वजनी गटात ब्रॉंझ मेडल मिळवून यश संपादन केल्याबद्दल अतिग्रे ग्रामपंचायतच्या वतीने सायली सूर्यवंशी हिचा २६ जानेवारी रोजी भव्य सत्कार घेण्यात आला. त्यावेळी सायलीला लाभलेल्या मार्गदर्शकांचे कौतुक करण्यात आले.वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा वेळी काही खेळाडूंनी आपली साहसी प्रात्यक्षिके करून दाखवली.
अकॅडमीचे अध्यक्ष निलेश परीट,सचिव आश्लेषा परीट, प्रशिक्षक यासीन मुल्ला यांचे सर्वच यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यांचे रुकडी व रुकडी पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रूकडी गावचे माजी उपसरपंच शामूवेल लोखंडे,रोहन साजणे,संजय खोत व परीट समाजाचे अध्यक्ष विठ्ठल परीट यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती होती.यावेळी पालक व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.आभार अकॅडमीचे अध्यक्ष निलेश परिट यांनी मानले.

ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected