पार्वती औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचा देशाच्या विकासामध्ये मोठा सहभाग – क्रीडा मंत्री संजय बनसोड
यड्राव / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्याचा परिसर विकसनशील आहे. यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये वीस हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर येथील उलाढाल दोन हजार कोटींची असून येथील ७५ टक्के उत्पादने इतर राज्य व बाहेर देशांमध्ये निर्यात होतात,ही अभिमानाची गोष्ट आहे.
म्हणूनच येथील उद्योजकांचा आपल्या देशाच्या विकासामध्ये
मोठा सहभाग आहे,असे गौरवोद्गार क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काढले.
शिरोळ तालुक्यातील खेळाडूंच्या विकासासाठी शिरोळ
येथे होणारे तालुका क्रीडा संकुल व जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू स्टेडियम दर्जेदार पद्धतीने तयार होणे आवश्यक आहे. याकरीता तालुका क्रीडा संकुलासाठी असणारी पाच कोटी रुपयांच्या निधीची मर्यादा वाढवून विशेष बाब म्हणून आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल,अशी ग्वाही क्रीडामंत्री बनसोडे यांनी यावेळी दिली.
यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ. राजेंद्र
पाटील यड्रावकर,जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर,यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, उद्योजक एस.व्ही.कुलकर्णी,शरद इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट अनिल बागणे,शरद साखर कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर,पार्वती औद्योगिक वसाहतीचे सीईओ अभिजित पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री.बनसोडे म्हणाले, देशभरातील ऑटोमोबाईल
इंडस्ट्रीजला लागणारी बहुतांश यंत्रसामग्री पार्वती औद्योगिक
वसाहतीमध्ये तयार होते, ही गौरवास्पद बाब आहे. या
औद्योगिक वसाहतीला सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक
ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे नमूद करुन ना. बनसोडे म्हणाले,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. आमदार यड्रावकर हे अभ्यासू नेते असून या भागाच्या विकासासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.
शिरोळ तालुक्यातील टाकळी येथे पहिली एमआयडीसी
निर्मितीसाठी शासनाच्या वतीने आवश्यक तेवढा निधी देण्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार करत आहे,असे नामदार बनसोडे यांनी
सांगितले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, पार्वती
औद्योगिक वसाहतीमुळे सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा उद्योजक
होऊन त्याच्याकडून चार लोकांना काम मिळाले आहे.सहकार महर्षी शामराव अण्णांनी स्थापन केलेल्या ३०० एकराच्या वसाहतीमध्ये उद्योगासाठी लागणारा सर्व योजना उपलब्ध केल्याकेल्या आहेत. याचबरोबर वसाहती अंतर्गत १३ कोटी ७६ लाखाच्या १८ किमीचे रस्ते,गटारी, स्ट्रीट लाईट या
कामाचा शुभारंभ आज होत आहे.
स्वागत व प्रस्ताविक अजय पाटील यांनी केले. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा सत्कार आमदार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.आमदार राजेंद्र पाटील यांचा सत्कार महावीर खवाटे यांनी केला.उद्योजक एस. व्ही. कुलकर्णी व कुणालसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांचेही भाषण झाले.
यावेळी गजानन सुलतानपूरे,तहसीलदार अनिलकुमार हेळकर,गट विकास अधिकारी शंकर कवितके महावीर मुदगल,डी.बी.पिष्टे, अमित गाठ, सरदार सुतार, उल्हास भोसले, महेश कुंभार, ग्रामसेवक उमेश रेळेकर,गणेश आवळे, सुजित गरड,महावीर पाटील,जयसिंगपूर नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हापरिषद सदस्य यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा