सामाजीक
मजरे कारवे येथे ११ फेब्रुवारीला शिवचरित्रावर सामान्यज्ञान स्पर्धा
चंदगड / प्रतिनिधी
मजरे कारवे ( ता.चंदगड )येथील शिवनेरी तरुण मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आंतरराज्य सामान्यज्ञान स्पर्धा रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२ यावेळेत महात्मा फुले विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा १ ली ते ७ व ८ वी पासून पुढे अशा दोन गटात होणार आहे.
पहिल्या गटासाठी ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१, ७०१, ६०१, ५०१, ३०१ व २०१ रुपये अशी बक्षिसे तर मोठ्या गटासाठी ७००१, ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१, ७५१, ५५१, ४०१, ३०१ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.तरी इच्छुकांनी सूरज हारकारे,महेश बोकडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा