शैक्षणिक

मुलांवर अधिक बंधने लादल्यास बिघडू शकतात – अध्यापिका प्रमिला कुंभार

सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे

संत तुकाराम हायस्कूलमध्ये हळदीकुंकू समारंभ संपन्न
चंदगड / प्रतिनिधी
सुंडी ता.चंदगड येथे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित संत तुकाराम हायस्कूलमध्ये शनिवार दिनांक २७ जानेवारी रोजी पालक मेळावा व हळदीकुंकू समारंभ असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री शंकर दत्तू घोळसे व प्रमुख वक्ते म्हणून सौ प्रमिला कुंभार प्राथमिक शिक्षिका श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मलतवाडी या होत्या.
प्रमिला कुंभार आपल्या भाषणात किशोरवयीन मुला-मुलींच्या पालकत्वावर विशेष भर दिला.मुलांवर अधिक बंधने लादल्यास मुले बिघडू शकतात.तेव्हा त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा.तसेच विध्यार्थ्यांच्या आरोग्याकडे,योगाकडे अधिक लक्ष द्यावे असे सांगितले.
यावेळी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री.पी.एस. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष श्री.एन.एम. पाटील व उपाध्यक्ष श्री.झी.नी. पाटील गुरुजी उपस्थित होते तसेच कमिटी सदस्य श्री.तानाजी नारायण टक्केकर, सौ.निता निवृत्ती पाटील,उपसरपंच सौ. शुभांगी पाटील, सदस्या सौ. संजीवनी पाटील, सौ.माधुरी पाटील, सौ सारिका पाटील तसेच कार्यक्रमाच्या प्रायोजक सौ. माधुरी टक्केकर,तसेच गावातील सर्व बचत गटाच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा,सचिव तसेच बहुसंख्येने माता पालक, सुंडी ,महिपाळगड, करेकुंडी गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री वाकोबा पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन श्री.बी.व्ही. केसरकर यांनी केले व आभार श्री.एम.के.भुजबळ सर यांनी मानले.

ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected