दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
शिरोळ / प्रतिनिधी
कारखान्याचे आद्य संस्थापक माजी आमदार माजी जि. प.अध्यक्ष दलितमित्र दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची पुण्यतिथी निमित्त श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्याचप्रमाणे स्व. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक रणजीत कदम यांनी स्व. दत्ताजीराव कदम अण्णा यांच्या पूर्णकृती पुतळ्यास संचालक रावसाहेब नाईक व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी उपस्थित संचालक इतर मान्यवर व उपस्थितानी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी संचालक इंद्रजीत पाटील,शेखर पाटील, ऍड प्रमोद पाटील,निजामसो पाटील,अमर यादव विजय सूर्यवंशी, दरगू गावडे, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सेक्रेटरी अशोक शिंदे,शेती अधिकारी श्रीशैल हेगाना, डिस्टलेरी मॅनेजर एस टी यादव,वर्क्स मॅनेजर संजय संकपाळ, प्रोडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे, मॅनेजर फायनान्स एस एम भोसले,परचेस ऑफिसर वि टी माळी, ऊर्जांकुर मॅनेजर व्ही आर इंगळे, गेस्ट हाऊस इन्चार्ज शक्तीजित गुरव, सॅनिटरी इन्स्पेक्टर बाळासो गावडे, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, लेबर वेल्फेअर ऑफिसर जयदीप देसाई, हेडटाईम किपर राजेंद्र केरीपाळी, सिव्हिल इंजिनिअर एल पी पाटील,सिविल इंजिनिअर यशवंत माने,सुरक्षा अधिकारी एस व्ही घारगे पर्यावरण मॅनेजर सुनील पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक ए एम नानिवडेकर तसेच दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर,अमोल चव्हाण सरपंच,उदय संकपाळ,शशिकांत पाटील, प्रकाश हलवाई, उदय पाटील (सर) हरी मोटे , भरत पाटील,कुमार गुरव,इरगोंडा देसाई, रोहन देसाई,आर के पाटील,दत्ता कोरे तसेच शर्करा औद्योगिक श्रमिक संघ कामगार सोसायटी यांचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा