खेलो इंडिया युथ गेम्सचे ब्रॉन्झ मेडल ऐश्वर्या व सोनल यांनी पटकावले
अतिग्रे / प्रतिनिधी
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव व संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी सोनल पाटील या दोघींनी चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी झालेल्या 6 व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये ‘लॉन टेनिस’ या खेळ प्रकारामध्ये ब्राँझ मेडल पटकावले.
ऐश्वर्या जाधव या विद्यार्थिनीने सिंगल प्रकारातही ‘लॉन टेनिस’ मध्ये ब्रॉन्झ पदक मिळवत महाराष्ट्र राज्यात आपले स्थान अव्वल राखले. ऐश्वर्याने रुमा गायकवरी (महाराष्ट्र) हीचा दुसऱ्या फेरीत 6-2 ने पराभव केला. तर प्रथम फेरीत उत्तरप्रदेशच्या शगुनकुमारी हिलाही पराभूत केले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तिने नावलौकिक प्राप्त केले आहे. टेनिस मध्ये महाराष्ट्र मुलींच्या संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले. महाराष्ट्र राज्य खेलो इंडिया युथ गेम्समध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.
सोनल व ऐश्वर्या यांनी लॉन टेनिस खेळात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत असताना दिल्ली संघाच्या रिया व यशिका यांना टेनिस डबलमध्ये पराभूत करून ब्रॉन्झ मेडलवर आपले नाव कोरले. खेलो इंडिया साठी संपूर्ण देशातून 5600 खेळाडू वेगवेगळ्या खेळ प्रकारांमध्ये सहभागी झाले होते. ऐश्वर्याला प्रशिक्षक हर्षद देसाई तर सोनलला प्रशिक्षक हेमंत बेंद्रे पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. या दोघींच्या यशाबद्दल संस्थापक चेअरमन श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी ऐश्वर्या व सोनलचा विशेष सत्कार केला.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा