राजकीय

मुंबईच्या ग्राहकांनी टोण्ड दुधाचा लाभ घ्यावा – चेअरमन अरुण डोंगळे यांचे प्रतिपादन

मुंबई / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत गोकुळ शक्ती या नावाने तयार करण्यात आलेल्या नवीन गुणप्रतीच्या टोण्ड दूधाचा विक्री व वितरण शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री मा.नाम.हसन मुश्रीफसो यांच्या शुभहस्ते, माजी गृहराज्‍यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांच्या अध्यक्षतेखाली व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत नवी मुंबई (वाशी) येथे संपन्‍न झाला.
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफसो म्हणाले कि,‘उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतीच्या दुधामुळे गोकुळ दूध संघाने मुंबई,पुणे,कोकण व अन्य ठिकाणी आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती मोठा ग्राहक वर्ग निर्माण केला असून,दिवसेंदिवस दूधाची मागणी वाढत आहे.सर्व सामान्य ग्राहक तसेच मुंबईतील वितरक यांनी ठराविक प्रतीचे स्पेशल दूध गोकुळकडून उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. यावरती निर्णय होवून गोकुळने ४.१ फॅट व ९.२ एस.एन.एफ या प्रतीचे गोकुळ शक्ती या नावाचे स्पेशल होमोजिनाइज्ड व बॅक्टोफ्युज दूध मार्केटमध्ये आणले आहे.निश्चितच ते ग्राहकांच्या पसंतीस पडेल.महाराष्ट्रातील इतर दूध संघाचे दूध हे गोकुळ या एकाच ब्रँड खाली विकले जावे,निश्चितच गोकुळ आपल्या गुणवतेच्या जोरावरती महाराष्ट्राचा ब्रँड बनेल असे गौरवोद्गार काढले.
यावेळी बोलताना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले कि,गोकुळ दूध आपल्या उत्कृष्ठ चवीमुळे मुंबई तसेच इतर उपनगरामध्ये घराघरात पोहोचला असून गोकुळनें विश्वासार्हता जपली आहे.बाजारपेठेमध्ये वेग वेगळ्या दूध कंपनीमार्फत नवनवीन दूध व दुग्धजन्य उत्पादने येत आहेत.गोकुळचे नवीन प्रतीचे गोकुळ शक्ती दूध हे निश्चित बाजारपेठेमध्ये नाव करेल व वितरक ही विक्रीसाठी सहकार्य करतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, संघामार्फत बाजारात सध्या फुल क्रीम व गाय दुधाची विक्री सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पणजी(गोवा), पुणे व मुंबई, ठाणे जिल्ह्यात केली जात आहे. सध्या गोकुळची दररोज १४ लाख लिटर पर्यंत दुधाची विक्री केली जात आहे. दुधाबरोबरच गोकुळच्या पनीर, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेवर मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात बाजारातून मागणी होत असते.गेले काही दिवसापासून दूध घेणाऱ्या ग्राहकांकडून विशेषतः स्पेशल होमोजिनाइज्ड केलेले टोण्ड दुधाची उपलब्धता करून द्यावी अशी विनंती केली जात होती. मुंबई येथील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गोकुळने दुधावर विशेष प्रक्रिया स्पेशल होमोजिनाइज्ड व बॅक्टोफ्युज केलेली टोण्ड दूध ‘गोकुळ शक्ती’ या नावाने विक्री करणेचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे. सदरचे टोण्ड दूध हे पाश्चराईज्ड, बॅक्टोफ्युज व स्पेशल होमोजिनाइज्ड बरोबरच व्हिटॅमिन ‘ए’ व ‘डी’ ने फोर्टीफाईड केले असल्याने त्याची सेल्फ लाईफ वाढून गुणवत्ता देखील चांगली राहणार आहे.
‘गोकुळ शक्ती’ या टोण्ड दूधाची गुणवत्ता फॅट ४.१ व एस.एन.एफ. ९.२ असून मार्केटमध्ये दुधाची विक्री किंमत प्रतिलिटर रुपये ५५ इतकी ठेवण्यात आली आहे. हे टोण्ड दूध १ लिटर व ५ लिटरचे पाऊचमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. निश्चितच स्पेशल होमोजिनाइज्ड व बॅक्टोफ्युज केलेले ‘गोकुळ शक्ती’ टोण्ड दूध ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असे मनोगत चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त करून मुंबई ग्राहकांनी या टोण्ड दुधाचा लाभ घ्यावा असे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी आवाहन केले.‌
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले तर आभार शशिकांत पाटील चुयेकर यांनी मांडले. सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले.
यावेळी गोकुळ दही नवीन दोन किलो व दहा किलो मधील टब पॅकिंगचे वितरण करण्यात आले. तसेच वाशी शाख्येमध्ये गोकुळ शॉपीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संचालक बाबासाहेब चौगले,अभिजीत तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अम‍रसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, वाशी शाखेचे व्‍यवस्‍थापक दयानंद पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected