सामाजीक

अथर्व-दौलत कारखान्याकडून ऊस बीले बँकेत जमा – चेअरमन मानसिंग खोराटे यांची माहिती

हलकर्णी / प्रतिनिधी
येथील अथर्व-दौलत कारखान्याने चालू गळीत हंगामात ३ लाख ४० हजार मे. टन ऊसाचे गळीत झाले असुन १ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंतच्या ऊसाचे बील २१ कोटी ८ लाख ४१ हजार ४२४ रुपये इतकी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या नावे जमा केलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.अथर्व दौलत कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळच्यावेळी ऊस बीले वेळेत आदा करुन शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या आर्थिक अडचनीतून बाहेर काढण्यासाठी अथर्व दौलत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावुन सहकार्याची भुमीका घेत आहे. चंदगड आजरा गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थीक उन्नतीसह सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याने अथर्व-दौलत कारखान्याने योग्य नियोजन केले असल्याने सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने सुरु आहे.शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला यावा यासाठी शेती विभागामार्फत तोडणी व ओढणी यंत्रणेचे चांगल्या पध्दतीने नियोजन करुन कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे. तसेच कारखान्याने अथर्व-दौलत व अँग्रोमोटो इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त कार्यक्रमातून हुमनी कीड नियंत्रण तसेच शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी गटवार प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. एकरी ऊस उत्पादण वाढीसाठी शेतकऱ्यांमध्ये अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, माती परिक्षन करणे, टिबक सिंचनचे महत्व तसेच ऊसावरिल किडनियंत्रण इत्यादी बाबत गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्यात शेतक-यांची कार्यशाळा घेणेचे नियोजन केले असुन, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या ऊस विकासाबाबतच्या समस्या सोडविणेसाठी ऊसविकास कार्यक्रम सक्षमपणे राबविण्याचे ठरले आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना त्यांच्या सर्वागीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटिबध्द राहणार असल्याची माहिती व्यवस्थापनामार्फत देण्यात आली.
उत्कृष्ट दर्जेदार कंपोष्ट खताची निर्मीती चालु असुन, ते माफक दरात कारखाना साईटवरुन वितरित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस अथर्व-दौलत कारखान्याला पाठवण्याचे आवाहन अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी केले. या वेळी पृथ्वीराज खोराटे, संचालक विजय पाटील, युनिटहेड महेश कोनापुरे, ओ.एस.डी विजय मराठे, प्रोसेस मॅनेजर रामपुरे, पी.आर.ओ दयानंद देवाण, फायनान्स मॅनेजर सुनिल चव्हाण यांचेसह कारखान्याचे खातेप्रमुख उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected