अनिल बागणे यांचा ‘धर्मभूषण’ उपाधीने गौरव
जयसिंगपूर त्रैलोक्य आराधना : श्री कुंथुसागर महाराज, समंतभद्रनंदी महाराजांचे सानिध्य
जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथील दक्षिण भारत जैन सभेचे ट्रस्टी,शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल आप्पासाहेब बागणे यांना ‘धर्मभूषण’ हि उपाधी देवून गौरविण्यात आले.पूज्य गणाधिपती गणधराचार्य़ श्री 108 कुंथुसागरजी महाराज यांचे प्रेरणेने श्री 1008 भगवान चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर,श्री.त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सव समिती व सकल दिगंबर जैन समाज यांचेकडून प्रदान करण्यात आले.
पूज्य एलाचार्य श्री 108 समंतभद्रनंदीजी महाराज, पूज्य बालाचार्य श्री 108 शांतीनंदीजी महाराज, पूज्य श्री 108 प्रभाचंद्रनंदीजी महराज, पूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामिजी (कोल्हापूर) यांच्या पावन सानिध्यात हि उपाधी देण्यात आली. यावेळी त्यांच्या आई श्रीमती कमल बागणे, सौ. शशिकला बागणे उपस्थीत होते.
श्री.अनिल बागणे हे लहानपणापासूनच धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या सहवासात त्यांनी कार्य केले आहे. वीर सेवा दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, अहिंसा, शाकाहार, हुंडाबळी परितक्त्या महिला व युवक संघटन यासाठी मोठे काम केले आहे. 1986 साली पुणे येथे महाराष्ट्रातील पहिल्या व्यसनमुक्ती दिंडीचे आयोजन केले होते. व्यसनमुक्ती चळवळीसाठी कर्मवीर सेवा संघाची स्थापना केली. अनेक पूजेमध्ये स्वंयसेवकाचे संयोजक म्हणून त्यांनी योगदान दिले आहे.
शरद इन्स्टिट्युटच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. दक्षिण भारत जैन सभा, श्री 1008 भ. चंद्रप्रभू दिगंबर जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ते धार्मिक कार्यात योगदान देत आहेत.
स्व. कुचनुरे सरांचा वसा आणि वारसा यांचे जतन करण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांनी धर्म व समाजोपयोगी कार्यात सहभाग घेवून धर्म सुरक्षा व धर्मप्रभावनेचे कार्य पार पाडले आहेत. याप्रसंगी त्रैलोक्य आराधना महोत्सव समिती, पदाधिकारी, श्रावक श्राविका उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा