भारतीय जनता पार्टी आणि शिवाजीराव पाटील युवा मंचच्या वतीने नोकरी महोत्सव व उद्योजकता महामेळावा
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदार संघातील चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील सुशिक्षित,बेरोजगार व होतकरू युवक – युवतींसाठी नोकरी आपल्या दारी या संकल्पनेतुन नोकरीची सुवर्णसंधी मिळवूण देण्यासाठी ७५ पेक्षा अधिक कंपन्या हजारो नोकऱ्या देणार असून सोबतच स्वयंरोजगार प्रतिनिधींचा सहभाग असलेला भव्य नोकरी महोत्सव व उद्योजकता महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे आयोजन चंदगड विधानसभा प्रचार प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी केले आहे. हा मेळावा रविवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे.चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मैदानात संपन्न होणार आहे.अशी माहिती शिवाजीराव पाटील यांनी दिली आहे.
चंदगड मतदार संघातील बेरोजगार, गरीब तरुणांना शहरात जाऊन नोकरी शोधणे शक्य नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरी पासुन वंचित आहेत.नेमकी नोकरी कुठे शोधावी यासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.त्यांच्या प्रयत्नांना वाव देण्यासाठीच हा उपक्रम रबावण्यात येत असल्याचे शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.तसेच सर्वांनी या नोकरी महामेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा