उद्योजकीय यशासाठी शिस्त, वक्तशीरपणा, कठोर परिश्रम आवश्यक : डॉ.वेर्णेकर

Oct 10, 2026 - 18:29
 0  1
उद्योजकीय यशासाठी शिस्त, वक्तशीरपणा, कठोर परिश्रम आवश्यक : डॉ.वेर्णेकर

कोल्हापूर : प्रतिनिधी 

जनरेशन-झेड (Gen-Z) मधील तरुणांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याच्या घसरत्या स्तराबद्दल चिंता व्यक्त केली. आधुनिक कॉर्पोरेट क्षेत्रातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा भक्कम पाया तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, उद्योजकीय यश संपादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख घटकांवर प्रकाश टाकताना त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, वक्तशीरपणा आणि कठोर परिश्रम ही मूल्ये आपल्या जीवनात रुजवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे सल्लागार आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथील प्रोफेसर एमेरिटस प्रा. (डॉ.) सचिन एस. वेर्णेकर यांनी केले.

संजय घोडावत विद्यापीठाच्या व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे गुरुवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी बी.कॉम., बीबीए आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी तसेच प्राध्यापक तसेच विद्यापीठाचे प्रेसिडेंट संजय घोडावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक प्रा. (डॉ.) ए. एम. गुरव यांनी प्रश्नोत्तरांच्या उत्स्फूर्त सत्रात विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. सूत्रसंचालन डॉ. अर्चना माणकर यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0