महेश दळवी उर्फ एमडीवर अज्ञात हल्लेखोरांचा भरदिवसा गोळीबार

दानोळी येथील चांदोली वसाहत गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे.

Oct 19, 2026 - 14:16
 0  318
महेश दळवी उर्फ एमडीवर अज्ञात हल्लेखोरांचा भरदिवसा गोळीबार
महेश दळवी उर्फ एमडीवर अज्ञात हल्लेखोरांचा भरदिवसा गोळीबार

जयसिंगपूर : प्रतिनिधी

 प्राथमिक माहितीनुसार दानोळी येथील चांदोली वसाहत येथील महेश दळवी उर्फ एमडी आपल्या शेताकडे जात असताना 10:00 ते 10:15 च्या सुमारास तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर तीन राऊंड फायर केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.

गंभीर जखमी झालेल्या महेश दळवी उर्फ एमडी याला तातडीने पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.

दरम्यान, या गोळीबारामागील कारण अद्याप अस्पष्ट असून जयसिंगपूर पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0