जयसिंगपूर येथील आंबेडकर सोसायटीत धाडसी चोरी
साडेचार लाखांचे सोन्याचे ऐवज लंपास
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीतील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी करून तब्बल ४ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आंबेडकर सोसायटी, प्लॉट क्रमांक ६९ येथे राहणाऱ्या सारा सचिन असुर्लेकर (वय ५२) या २६ जुलै रोजी दुपारी घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, २७ जुलै रोजी मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाज्याचे कुलूप व कडी उचकून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट व तिजोरी उघडून सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याची चेन, नेकलेस, हातातील कंगन, तीन अंगठ्या आणि कानातील जोड अशा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.पुन्हा एकदा चोरट्यानी डोकं वर काढले आहे.
या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उर्मिला खोत पुढील तपास करीत आहेत.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
1
Sad
0
Wow
0