वेदांत गावडे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत सांघिक द्वितीय
शिरोळ : प्रतिनिधी
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.दत्तनगर शिरोळ अंतर्गत असलेल्या कै.दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ ट्रस्ट च्या व्यायाम शाळेचा खेळाडू कु.वेदांत अनिल गावडे याने १७ वर्षीय शालेय राज्यस्तर मल्लखांब स्पर्धेत कु.वेदांत अनिल गावडे यांने सांघिक द्वितीय क्रमांकाने यश मिळविले.त्याला एनआयएस कोच सर्वोदय देबाजे यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा तालुका क्रीडा संकुल कोपरी,बारा बंगला,ठाणे पूर्व येथे दि.३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न झाली.
श्री पद्माराजे विद्यालय व ज्युनि. कॉलेज शिरोळमध्ये ११वीत शिकत आहे. राज्यस्तरावर भाग घेणारा कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे.या खेळाडूला उद्यान पंडित गणपतराव पाटील,चेअरमन रघुनाथ पाटील व मंडळाचे अध्यक्ष संजीवकुमार देसाई,सचिव निलेश पाटील,सदस्य- विलासराव माने व प्रशिक्षक- संजय देबाजे सर यांचेसह सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0