स्व.भगवानराव घाटगे यांचे कार्य समाजाला दिशादर्शक - चेअरमन माधवराव घाटगे
दत्त नागरी संस्थेत स्व. भगवानराव घाटगे यांना अभिवादन
जयसिंगपूर : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन स्व. भगवानराव घाटगे यांनी दत्त नागरी पत संस्था व गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वागीण विकास केला असून त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले. स्व. भगवानराव घाटगे यांच्या सोळाव्या स्मृतीदिन निमित्य जयसिंगपूर येथील दत्त नागरी पत संस्थेच्या प्रदान कार्यालयात विविध मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी चेअरमन माधवराव घाटगे बोलत होते.
स्व.भगवानराव घाटगे यांच्या कार्याचा आढावा घेताना श्री. घाटगे म्हणाले, चांगली शेती व व्यापार करीत त्यांनी गावात सेवा सोसायटी, पाणी पुरवठा संस्था आदी संस्थाची स्थापणा केली करून सामान्य शेतकर्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. जिद्द, चिकाटी , प्रामाणिकपणा व कष्टाच्या जोरावर त्यांनी आयुष्यातील अनेक संकटावर मात करीत समाजउपयोगी कार्य केले. गावात त्यांनी लोकांसाठी पोस्ट ऑफिस व एस.टी. सेवा देखील सुरु केली. गावचे पंधरा वर्ष सरपंच तसेच पंचायत समिती , जिल्हा परिषद येथे प्रतिनिधित्व करून ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या, अडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्व. घाटगे यांच्या विचाराचा व संस्काराचा वारसा आम्ही निश्चितपणे पुढे नेऊन शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून चांगले कार्य करीत राहू असा विश्वास श्री. घाटगे यांनी व्यक्त केला.
दत्त नागरी चे चेअरमन शिवाजीराव माने -देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला गुरुदत्त शुगर्स चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे, धीरज घाटगे, संचालक बबन चौगुले , बाळासाहेब पाटील, शिवाजी सांगले, कै.भगवानराव घाटगे सेवा सोसायटीचे चेअरमन कुमार माने, अशोकराव जगताप ,केशव घाटगे, ज्योती गोधडे, शाम बंडगर, पंतगराव गोधडे, तसेच दत्त नागरी पत संस्था व भगवानराव घाटगे सेवा सोसायटी यांचे सर्व संचालक मंडळ ,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले .
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0