सामाजिक मंडळ जुगार अड्डे चालवीत असल्याचा कांगावा

बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करा : पोलीस यंत्रणेला कला क्रीडाचे साकडे

Oct 16, 2026 - 09:56
Oct 16, 2026 - 11:17
 0  14
सामाजिक मंडळ जुगार अड्डे चालवीत असल्याचा कांगावा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यातील आलास येथे कला-क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू असल्याची पडताळणी पोलीस प्रशासनाने करावी.जर या तक्रारीत तथ्य आढळले नाही ज्याने कुणी ही तक्रार दिली आहे त्या तक्रारदारावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करावा असे साकडे एका मंडळाच्या प्रमुखांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे घातले आहे.

याप्रकरणी श्री.साई कला क्रीडा सांस्कृतिक व मनोरंजन मंडळ, आलास या मंडळाचे अध्यक्ष सुहास विलास कांबळे यांनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.तालुक्यातील बहुचर्चित यशवंत ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास काळे यांनी केलेल्या आरोपांमागील सत्यता तपासूनच कारवाई करावी, अशी मागणी कला क्रीडा मंडळाकडून करण्यात आली. असून तसे निवेदन ही पोलीस प्रशासनात सादर केल्याची माहिती आहे.

आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे तक्रारदार यांच्याकडून घ्यावेत आणि त्यांची पडताळणी करावी. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असे निवेदनात नमूद आहे. केवळ तक्रारींच्या आधारे आरोप ग्राह्य धरू नयेत अशी विनंती करण्यात आली असून चौकशीत आरोपात तथ्य आढळले नाही, तर मंडळाची बदनामी केल्याप्रकरणी आणि आर्थिक स्वार्थातून पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्रास दिल्याप्रकरणी कैलास काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही या निवेदनात कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुहास विलास कांबळे यांनी केली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0