कोते ग्रामपंचायत मध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न इतिहासात प्रथमच बैठक : नवयुवकात समाधान

धामोड : प्रतिनिधी

Sep 5, 2026 - 20:35
Sep 5, 2026 - 20:36
 0  69
कोते ग्रामपंचायत मध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न  इतिहासात प्रथमच बैठक : नवयुवकात समाधान
कोते ग्रामपंचायत मध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न  इतिहासात प्रथमच बैठक : नवयुवकात समाधान
कोते ग्रामपंचायत मध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न  इतिहासात प्रथमच बैठक : नवयुवकात समाधान

राधानगरी तालुक्यातील कोते गावामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमच गावातील सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची शांतता कमिटी बैठक उत्साहात संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच रंगराव गुरव होते. 

सरपंच गुरव यांनी सर्व समावेशक अशी बैठक बोलावल्याने युवक वर्गासह नागरिकात समाधानाचे प्रतिसाद उमटत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या या बैठकीमध्ये यंदाचा गणेशोत्सव हा कायदा व सुव्यवस्था आबादीत ठेवून आज पर्यंतची परंपरा कायम ठेवण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले लोकनियुक्त सरपंच रंगराव गुरव यांनी सुचित केल्यानुसार सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करून उत्सवापूर्वी स्वच्छता अभियान राबवावे हाही ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.यंदाचा गणेशोत्सव सुद्धा गुण्यागोविंदाने साजरा करण्याचे ठरले. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर अतिशय जपून करावा आणि कोणाच्याही कसल्याही प्रकारच्या भावना दुखावू नयेत याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे आवाहन केले.सर्व मंडळाच्या यंदा श्रींचे विसर्जन एकाच दिवशी न करता प्रत्येक मंडळाने विविध तारखा व दिवस ठरवून घेतल्या आहेत. 

प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुभाष सामंत यांनी केले.अध्यक्षीय भाषणात बोलताना सरपंच रंगराव गुरव यांनी सर्व ग्रामस्थांचे तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्याबरोबरच असाच सामाजिक सलोख्याचा परंपरा जपण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा आणि हा प्रयत्न यशस्वी करावा, त्याचबरोबर गावच्या विकासासाठी सर्वांनी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत असे आवाहन केले, या आवाहनात सुद्धा सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य आबाजी कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

यावेळी जेष्ठ मार्गदर्शक आनंदा जंगले, पंढरी पाटील,अर्जुन पाटील सागर पाटील,धनाजी पाटील,धनाजी गुरव,वेताळ मंडळाचे सागर गुरव, मधुकर पाटील,भगतसिंग मंडळाचे तुळशीदास मांडवकर,अशोक पाटील,आझाद मंडळाचे रोहन गुरव, ओंकार पाटील,अष्टविनायक मंडळाचे दीपक परितकर,संकेत चव्हाण, गणेश तरुण मंडळाचे राजू तेलवी,अनिकेत पाटील, भीमक्रांतीचे ऋग्वेद कांबळे, कार्तिक कांबळे,गोपी पाटील,सुहास बोरकर, युवराज जंगले,पंकज गुरव, करण कोतेकर,संभाजी गुरव,अजिंक्य गुरव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.जय शिवराय मंडळाचे अध्यक्ष शुभम गोंधळी यांनी आभार मानले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0