प्रेमाविवाहाच्या रागातून एकावर प्राणघातक हल्ला

संशयितांना पोलिसांनी केली अटक

Oct 13, 2026 - 18:44
 0  182
प्रेमाविवाहाच्या रागातून एकावर प्राणघातक हल्ला

चंदगड : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर कोयता व विळ्याने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.अजय नाईक (वय 28 रा.वरगाव ता. चंदगड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.तर ज्ञानेश्वर नाईक आणि अशोक रामू नाईक (दोघेही रा. वरगाव ता.चंदगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 3.45 वाजण्याच्या सुमारास पाटणे फाटा येथील शारदा मोबाईल शॉपीसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. फिर्यादी अजय नाईक मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी ज्ञानेश्वर नाईक आणि अशोक नाईक हे दोघे तेथे आले.

प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात व उजव्या हाताच्या मनगटाजवळ वार केला.तसेच विळ्याने डोक्यात व मानेवर वार केले.या हल्ल्यात अजय नाईक जखमी झाले.या प्रकरणी अजय नाईक यांनी चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 109(1), 3(5) व 351(2) कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0