कोथळीतील अपघातग्रस्त कुटुंबाला जिल्हा बँकेकडून दोन लाखांचा विम्याचा धनादेश प्रदान

जयसिंगपूर : प्रतिनिधी

May 6, 2026 - 15:01
 0  10
कोथळीतील अपघातग्रस्त कुटुंबाला जिल्हा बँकेकडून दोन लाखांचा विम्याचा धनादेश प्रदान

जयसिंगपूर–कोथळी मार्गावर दीड वर्षांपूर्वी झालेल्या मोटरसायकल अपघातात मृत्यू झालेल्या कोथळी विकास सेवा सोसायटीच्या कर्जदार सभासद सुदर्शन महावीर चुडाप्पा यांच्या वारसांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दोन लाख रुपयांचा अपघात विम्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सुदर्शन यांची बहीण सौ. सुप्रिया व्हराटे यांना कोथळी सोसायटीच्या कार्यालयात देण्यात आला.
या प्रसंगी बोलताना सोसायटीचे चेअरमन धनगोंडा पाटील यांनी सांगितले की, सुदर्शन चुडाप्पा हे सोसायटीचे कर्जदार सभासद होते. त्यांच्या अपघाती निधनानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ‘जनता अपघात विमा’ योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत देण्यात येत आहे. या मदतीमुळे कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गत आठवड्यात कोथळीतीलच तरुण शेतकरी भाऊसो गारे यांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. गारे हे देखील सोसायटीचे कर्जदार सभासद असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही या विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हा बँकेकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. संबंधित कुटुंबाला लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमास जिल्हा बँक जयसिंगपूर शाखेचे विभागीय अधिकारी बी. आर. पाटील, बँक निरीक्षक संतोष पाटील यांची उपस्थिती होती. तसेच कोथळी विकास सोसायटीच्या वतीने चेअरमन धनगोंडा पाटील यांच्या हस्ते आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे संचालक दिलीप पाटील (एम.डी.), अशोक बोरगावे, पोपट पाटील, संजय खवाटे, भीमा कांबळे, शितल बोरगावे, जितेंद्र पाटील, सुरगोंडा हौंजे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत एस. टी. पाटील यांनी केले, प्रास्ताविक संजय नांदणे यांनी केले तर आभार सचिव कल्लाप्पा हिंगमिरे यांनी मानले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0