शरद सहकारी साखर कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासले : आमदार यड्रावकर
शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ
पेठवडगाव : प्रतिनिधी
शरद सहकारी साखर कारखान्याने गेल्या पंचवीस वर्षात शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर देत सर्वांची बिले वेळेत देत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कारभार करून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. चालू हंगामातही दर देण्यात कारखाना आघाडीवर राहील. कामगारांनी नैतिक मूल्यांचे आचरण करून प्रामाणिकपणे काम केले पाहिज. गत वेळेप्रमाणे येणाऱ्या दिवाळीसाठीही कामगारांना २१ टक्के बोनस देण्यात येईल अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली.
नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी आमदार पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आले.यावेळी संचालक युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर,जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण,प्रचिता कोळी,पंचायत समिती सदस्य प्रतीक पाटील, फजलेअली पटेल,प्रविन देसाई,दिप्ती जाधव,उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले,शेतकऱ्यांच्या उसाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.यामुळे उत्पादनात १५ टक्के वाढ होऊन ३५ टक्के खर्चात बचत होईल. कारखाना ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहे.चालू हंगामात आठ लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यावेळी माजी उपसभापती राजकुमार भोसले,सरपंच अमोल कांबळे,आप्पासाहेब चौगुले,डी.बी.पिष्टे,पोपट भोकरे,रावसाहेब चौगुले,संजय नांदणे,शिवगोंडा पाटील,संजय बोरगावे, विद्यासागर मरजे, अभिजित भंडारी, रावसाहेब कुंभोजे, कार्यकारी संचालक मोतीलाल पट्टनकुडे,मुख्य कार्यकारी बी.ए.आवटी,शेती अधिकारी रमेश गंगाई उपस्थित होते.स्वागत संचालक सुभाषसिंग रजपूत यांनी केले. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0