शरद कृषी महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश

Oct 15, 2026 - 18:52
 0  2
शरद कृषी महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश

जयसिंगपूर : प्रतिनिधी 

जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाने आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत तृतय क्रमांक मिळविला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची येथे स्पर्धा झाल्या. 

स्पर्धेमध्ये 10 जिल्ह्यातून एकूण 26 मुलींचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये शरदने तृतीय क्रमांक मिळविले. संघामध्ये प्रगती कर्नाळे (संघप्रमुख) अक्षता सावंत, दर्शिका अदाना, जानवी बंडगर, तनुजा बोगरनाल, श्रेया पाटील, साक्षी आबाळे, श्रुती शिंदे, रसिका पवार, प्रांजली पाटील, साक्षी पाटील, आफ्रीन पेंढारी सहभागी होते. 

संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) व एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी संघाचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. सुशांत पाटील, उपप्राचार्य प्रा. संजय फलके व क्रीडाशिक्षक दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0