निधी वाटपामध्ये भेदभाव महा विकास आघाडीच्या महिला सदस्यांचे उपोषण

Aug 16, 2026 - 13:21
 0  3
निधी वाटपामध्ये भेदभाव महा विकास आघाडीच्या महिला सदस्यांचे उपोषण
निधी वाटपामध्ये भेदभाव महा विकास आघाडीच्या महिला सदस्यांचे उपोषण
निधी वाटपामध्ये भेदभाव महा विकास आघाडीच्या महिला सदस्यांचे उपोषण

शिरोळ : प्रतिनिधी-

पंचायत समिती पंधराव्या वित्त आयोगांमधून मिळणाऱ्या निधीमध्ये विरोधी पक्षाला निधी वाटपामध्ये भेदभाव होत असल्याने महा विकास आघाडीच्या पंचायत समिती महिला सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. गट विकास अधिकारी वर्ग -1 विजयकुमार परिट यांनी पंचायत समिती विकास आराखड्या संदर्भात लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.

पंचायत समिती सदस्या सौ. नीलम म्हेत्रे (नांदणी), सौ. दिपाली होगले (दानोळी), सौ. ज्योती कांबळे (कोथळी), सौ. राजश्री मानकापुरे ( गणेशवाडी) यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन पंधरावे वित्त आयोग निधी सर्व सदस्यांना समान मिळणे बाबत मागणी केली होती. गावची लोकसंख्या व जमिनीचे क्षेत्रफळ यानुसार या निधीचे समान वाटप करणे कायदेशीर असून सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव करू नये, असे निवेदनात म्हटले होते.

या प्रश्नी पूर्वी ठोस उत्तर न मिळाल्यास 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा देऊनही निर्णय न झाल्याने महाविकास आघाडीच्या सर्वच पंचायत समिती महिला सदस्यांनी आज सकाळी 11 वाजता उपोषण सुरू केले.

माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दरगू गावडे, विक्रम पाटील, सौरभ शेट्टी, तानाजी वठारे, बंडू पाटील, महेश परीट आदींनी गट विकास अधिकाऱ्यांना धारेवर धरत चर्चा केली. 

सकारात्मक चर्चेनंतर गटविकास अधिकाऱ्यांनी शासनाने 15 वा वित्त आयोग सन 2022-2023 ते 2025-2026 अखेर पंचायत समिती स्तरावरील आराखडा करणेबाबत मार्गदर्शक सुचना दिलेले आहेत. केंद्र शासनाने राज्यासाठी निधी वितरीत करताना सदर निधीची परीगनना सन 2011 च्या जगगणनेनुसारची लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषावर केली आहे. या निकषाला अधिन राहून पंचायत समिती सभा पंचायत समिती विकास आराखड्यास अंतिम मान्यता देईल. त्यानंतर प्रशासन त्या आराखड्याची अंमलबजावणी करेल. या प्रमाणे कार्यवाही करून पंचायत समिती शिरोळ चा विकास आराखडा केला जाईल अशा आशयाचे पत्र दिले. उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले.

यावेळी सचिन शिंदे, युनूस पटेल, दानोळी जि. प. सदस्या सौ. नंदिनी कांबळे, टाकवडे जि. प. सदस्या सौ. अर्चना चौगुले, जांभळी सरपंच सौ. अनुजा कोळी, टाकवडे सरपंच सौ. सविता चौगुले, राजगोंडा पाटील, कुमार सुतार, महावीर पाटील, श्रीकांत पाटील, अमोल चौगुले, अरविंद धरणगुत्तीकर, भीमगोंडा पाटील, रघुनाथ म्हेत्रे, जंबूकुमार चौगुले, प्रकाश पाटील, धन्यकुमार कारदगे, दीपक कांबळे, शीतल उपाध्ये, गणपती कोळी, आण्णासाहेब पाटील, बाहुबली चौगुले, दादा चौगुले, यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0