तिसरे नांगरट साहित्य संमेलन जयसिंगपुरात उत्साहात

Jun 8, 2026 - 16:40
 0  2
तिसरे नांगरट साहित्य संमेलन जयसिंगपुरात उत्साहात

जयसिंगपूर : प्रतिनिधी 

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था तसेच जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे नांगरट साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. जयसिंगपूर महाविद्यालयाच्या आवारातील डॉ. भिर्डी सभागृहात झालेल्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे होते. 

 सकाळी पहिल्या सत्रात खिलारी बैल जोडी आणि नांगराच्या फळाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार लेखक व विचारवंत पी साईनाथ, डॉ सुभाष अडदंडे यांच्यासह गौतमीपुत्र कांबळे, प्रवीण बांदेकर डॉ महेंद्र कदम प्रसाद कुलकर्णी विजय चोरमारे नामदेव माळी संदीप जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात शेतकऱ्यांचा आसूडानंतरच्या आजपर्यंतच्या शेतकरी चळवळी या विषयावर परिसंवाद झाला तर तिसऱ्या सत्रात रास होत चाललेली कृषी संस्कृती आणि कृषी सर्जनशीलता या विषयावर परिसंवाद झाला. परिसंवादांचे संयोजन डॉ महावीर अकोळे आणि प्रा डॉ गोमटेश्वर पाटील यांनी केले. 

 चौथ्या सत्रात सायंकाळी कवयत्री स्वाती शिंदे पवार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले. प्रा संदीप जगताप प्रशांत मोरे हनुमंत चांदुगडे लता ऐवळे एकनाथ पाटील भरत दौंडकर कल्पना दुधाळ रमजान मुल्ला आबा पाटील विलास माळी धर्मवीर पाटील आदी काव्य निर्माते या संमेलनात सहभागी झाले. 

 दरम्यान यंदा ज्येष्ठ पत्रकार लेखक विचारवंत श्री पी साईनाथ यांना पत्रकारिता, प्रा डॉ. मोहन पाटील यांना साहित्य क्षेत्रात आणि शेतकरी चळवळीत योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्ते जयकुमार कोले यांना स्वाभिमानी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

 या साहित्य संस्कृती जतन जोपासना आणि संवर्धन करणाऱ्या नांगरट साहित्य संमेलनाचे यशस्वी नियोजन आणि आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तसेच शिवार विकास संशोधन सेवा संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जयसिंगपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे भरत अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन पाटील यांच्यासह सर्व आयोजकांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0