माजी आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुरावाला यश

किडणी रुग्णांसाठी सेवा चंदगड मध्ये उपलब्ध

Jul 3, 2026 - 10:20
 0  274
माजी आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुरावाला यश

 चंदगड : राजाराम कांबळे

तालुक्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक ठरणारी डायलिसिस सेवा आता चंदगड ग्रामीण रुग्णालयात सुरू झाली असून या सुविधेसाठी माजी आमदार राजेश पाटील यांनी शासन स्तरावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले.

यापूर्वी डायलिसिस उपचारासाठी रुग्णांना गडहिंग्लज, कोल्हापूर किंवा बेळगाव येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. आता ही सुविधा चंदगडमध्येच उपलब्ध झाल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही महिन्यापासून सातत्याने विविध स्तरावर माजी आमदार राजेश पाटील यांचा पाठपुरावा सुरु होता. याविषयीं माहिती देताना ते म्हणाले कि,आपला तालुका आरोग्य क्षेत्रात विविध सुविधेपासून वंचित असून आरोग्यसेवेचा दर्जा सुधारावा यासाठी आपण विशेष प्रयन्त करणार आहोत.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गरजू रुग्णांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले. एकंदरीत नव्याने डायलिसिस सुविधा सुरू झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0