आयआयटी एनपीटीईएलकडून शरद इन्स्टिट्यूटचा सन्मान

एनपीटीईएलमध्ये देशपातळीवर सात पुरस्कार ; १९७२ लोकल चॅप्टरमध्ये द्वितीय क्रमांक

Aug 17, 2026 - 17:52
 0  1
आयआयटी एनपीटीईएलकडून शरद इन्स्टिट्यूटचा सन्मान
मुंबई : येथे आयआयटीमध्ये शरद इन्स्टिट्युटचा सन्मान स्विकारताना प्रा. जी.व्ही. पुजारी, डॉ. एस. आर. घोरपडे, प्रा. उज्वला पाटील, प्रा. एस. एन. बोडके व मान्यवर.

यड्राव : प्रतिनिधी

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला तीन व फॅकल्टींना चार आयआयटी, मुंबई एनपीटीईएल (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टक्नॉलॉजी इनहान्सड लर्निंग) मध्ये देशपातळीवर एकूण सात पुरस्कार मिळाले आहेत. देशातील एकूण १९७२ अॅक्टीव्ह लोकल चॅप्टरमध्ये शरद इंजिनिअरिंगने दुसरा क्रमांक मिळविला आहे.

यामध्ये इंजिनिअरिंगला स्पेशल कॅटेगरी अॅवार्ड कंटेंडर, बेस्ट रेटींग पॉईंट इम्प्रूव्हमेंट अवार्ड, बेस्ट सर्टिफाईड काऊंट इम्प्रूव्हमेंट अॅवार्ड मिळाले आहेत. आयआयटी मुंबई एनपीटीईएल हेड अँड्र्यू थंग्रेज यांच्या हस्ते समन्वयक प्रा. जी. व्ही. पुजारी यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच इंजिनिअरिंगच्या डॉ. एस. आर. घोरपडे यांना इनपीटीईएल डिसिप्लीन स्टार अॅवार्ड, प्रा. उज्वला पाटील यांना इनपीटीईएल मोटीव्हेटेड लर्नर अॅवार्ड, डॉ. के. हुसेन यांना इनपीटीईएल बिलिव्हरस अॅवार्ड मिळाला. शरद पॉलिटेक्निकच्या प्रा. एस. एन. बोडके यांना डिसिप्लीन स्टार अॅवार्ड मिळाला आहे. 

यावेळी आयआयटी मुंबई डॉ. नंदीता महादेवन, डॉ. श्रीधर गद्रे, आयआयटी चेन्नईच्या भारती बालाजी हे उपस्थीत होते. NPTEL हे सात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी बॉम्बे, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास आणि रुरकी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) द्वारे अभ्यासक्रम सामग्री तयार करुन ते प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना पुरवेल जाते. त्याचे कोर्स असून त्याचे परिक्षा घेतल्या जातात. 

शरद इन्स्टिट्युट २०१८ पासून एनपीटीईलचे कोर्स महाविद्यालयात राबवित आहे. एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या परिक्षेत महाविद्यालयातील २४ टॉपर, ५३ गोल्ड, २१७ इलाइट, ४५२ सिल्व्हर तर ३७८ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे कोर्स पूर्ण केला आहे. महाविद्यालयातील ४२ प्राध्यापकांनी कोर्स पूर्ण केला आहे. 

संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी प्राध्यापक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0