कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदान

Aug 22, 2026 - 12:34
 0  19
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदान

इचलकरंजी : प्रतिनिधी -

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे साखर उद्याेगाच्या प्रगतीसाठी दिलेले माेलाचे याेगदान, उच्च दर्जाच्या साखरेच्या उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरी तसेच उत्पादन व कार्यपद्धतीतील उल्लेखनीय कार्यक्षमता यांची दखल घेऊन दि शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट सब असाेसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संस्थेच्या 84 व्या वार्षिक अधिवेशनामध्ये गाेव्याचे मुख्यमंत्री प्रमाेद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी असाेसिएशनचे अध्यक्ष संजय अवस्थी उपस्थित हाेते. कारखान्याच्या वतीने हा पुरस्कार व्हा. चेअरमन बाबासाे चाैगुले, संचालक सुरज बेडगे, कार्यकारी संचालक मनाेहर जाेशी आणि कारखान्याच्या अधिकाèयांनी स्विकारला.

देशातील साखर व संलग्न उत्पादनांची गुणवत्ता, उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी किायतशीर व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी ही संस्था सातत्याने प्रयत्नशील असते. साखर उद्याेगाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय याेगदान देणारे उद्याेगसमूह, व्यावसायिक, तज्ञ व संस्थांचा गाैरव करण्यासाठी दि शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट सब असाेसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येताे.

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास मिळालेला हा पुरस्कार देशातील साखर उद्याेगाच्या तांत्रिक प्रगतीस आणि कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांनी व्यक्त केला. या पुरस्काराबद्दल कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद-शेतकरी, संचालक, ऊस ताेडणी मजूर-वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी-कर्मचारी-कामगार यांचा माेलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि संचालक आमदार राहूल आवाडे यांनी केले.

 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0