सुशांत मल्लाडे यांची व्यसनमुक्ती सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

Jul 28, 2026 - 13:13
 0  139
सुशांत मल्लाडे यांची  व्यसनमुक्ती सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

जयसिंगपूर : प्रतिनिधी 

दानोळी येथील सामाजिक कार्यकर्ते व सहयोग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष सुशांत प्रशांत मल्लाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा व्यसनमुक्ती सेलच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जपत पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे

मुंबई येथील पक्ष कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार जिंतेंद्र आव्हाड यांच्या शुभहस्ते निवडीचे अधिकृत पत्र सुपूर्द करण्यात आले.पक्षाचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत असतानाच या महत्त्वपूर्ण नियुक्तीची घोषणा करण्यात आली.याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 नियुक्तीनंतर बोलताना मल्लाडे यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून कोल्हापूर जिल्ह्यात व्यसनमुक्तीच्या माध्यमातून व्यापक सामाजिक कार्य उभारण्याचा आणि पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.या निवडीबद्दल त्यांचे राजकीय व सामाजिक स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0