श्री.दत्त साखर शिरोळमध्ये रोलर पूजन संपन्न
यंदा 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
शिरोळ : प्रतिनिधी
श्री. दत्त साखर शिरोळच्या 2026-27 च्या गळीत हंगामातील मिल रोलर पूजन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले .यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडणी व वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात करार करावेत. तसेच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे. गाळप हंगाम सुरळीत पार पडावा, यासाठी सर्व यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती वेगाने सुरू आहे. ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांशी करार करण्याची, तसेच त्यांना उचल रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील ,व्हॉइस चेअरमन शरदचंद्र पाठक तसेच कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, रणजित कदम, इंद्रजित पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, अॅड.प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव,दरगु माने गावडे,सिदगोंडा पाटील,सुरेश कांबळे, संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी,प्रदिप बनगे, बाळासाहेब पाटील-हालसवडे,रावसाहेब नाईक,मंजूर मेस्त्री, कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई सचिव अशोक शिंदे वर्क्स मॅनेजर एस ए चौगुले प्रोडक्शन मॅनेजर एम एस जाधव यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0